रायगड - शिवसेनेचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु, तक्रार होऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
'रायगडमधील शिवसेना उमेदवार अनंत गीतेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार होऊनही कारवाई नाही' - उमेदवार
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पुस्तिकेचे वितरण अजूनही थांबलेले नाही.
अनंत गीते यांच्या प्रचारसभांमधून सिंहावलोकन नावाची पुस्तिका वाटण्यात येत आहे. त्या पुस्तिकेवर प्रकाशकाचे नाव नाही, कुठे छापण्यात आली याचा उल्लेख नाही, तसेच किती प्रति छापण्यात आल्या आहेत, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. हा आचारसंहितेचा भंग आहे. याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पुस्तिकेचे वितरण अजून थांबलेले नाही.
जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग यांना कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊनही यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात येईल, अशी माहिती महाड येथे पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी सांगितले.