महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तटकरे म्हणतात.. सरकारनं दिलं, प्रशासनानं वाटलं.. पण बँकेनं लटकवलं..!

निसर्ग चक्रीवादळ होऊन आज एक महिना झाला असून शासनाने तातडीने जिल्ह्याला पावणे चारशे कोटीरुपये मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून पूर्ण झाले आहेत. आतापर्यत प्रशासनाने 134 कोटी रूपये निधीचे वाटप केले आहे. हा निधी नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी बँकांकडे दिला आहे. मात्र बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे हा निधी नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यात वर्ग झालेला नाही.

sunil tatkare
सुनील तटकरे

By

Published : Jul 4, 2020, 6:46 AM IST

Updated : Jul 4, 2020, 2:40 PM IST


रायगड- शासनाने नुकसनाग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी दिलेल्या पावणे चारशे कोटीच्या निधींपैकी 134 कोटी निधी प्रशासनाने बँकांकडे वर्गही केला आहे. मात्र बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे हा निधी नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. बँकांनी त्वरित नुकसनाग्रस्तांच्या खात्यात निधी वर्ग करावा अन्यथा वेगळे पाऊल उचलले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नारळ, सुपारी बागायतदार यांनाही झाडामागे नुकसान भरपाई देण्याबाबत प्रयत्न सुरू असून याबाबत त्यांना राज्य शासनाकडून वाढीव निधींचा दिलासा मिळेल असेही तटकरे म्हणाले

सुनिल तटकरे, खासदार

अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने आणि कोरोना बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बँकेच्या ढिसाळ कारभाराबाबत आरोप केला.

निसर्ग चक्रीवादळ होऊन आज एक महिना झाला असून शासनाने तातडीने जिल्ह्याला पावणे चारशे रुपये कोटी रुपये मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून पूर्ण झाले आहेत. आतापर्यत प्रशासनाने 134 कोटी निधीचे वाटप केले आहे. हा निधी नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी बँकांकडे दिला आहे. मात्र बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे हा निधी नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यात वर्ग झालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिक हे बॅँकेच्या नाकर्तेपणामुळे नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत, असा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. तर बँकेने आपले कर्मचारी आणि कामाचे तास वाढवून वर्ग झालेली रक्कम त्वरित नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यात जमा करण्याबाबत बँकांना सूचना केल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

नारळ, सुपारी बागायतदारांना मिळेल दिलासा-

नारळ, सुपारी बागायतदार यांना झाडांनुसार मदत मिळावी यासाठी खासदार शरद पवार आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून बागायतदारांना लवकरच वाढीव मदत मिळेल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचीही सकारात्मक भूमिका असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्ह्यात वादळामुळे पोल पडून, तारा तुटून वीज गेली असून अनेक भागात वीज पूर्ववत झाली आहे. तर श्रीवर्धन तालुक्यातही बारामती येथून 200 जणांची टीम दाखल झाली असून आठ दिवसात वीज पुरवठा सुरू केला जाईल असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.

Last Updated : Jul 4, 2020, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details