महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नौदलाचा कर्मचारी बेपत्ता होण्याआधी उरणपासून 25 किलोमीटर अंतरावर आढळले लोकेशन - Abhimanyu Base Camp

11 नोव्हेंबरला उरण येथील INS अभिमन्यू बेस कॅम्पमध्ये शेफ म्हणून काम करणारा नौदलाचा 22 वर्षीय कर्मचारी रायगड जिल्ह्यातून बेपत्ता ( 22 year old Navy officer missing ) झाला. त्याबाबतची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

Navy officer
नौदलाचा कर्मचारी बेपत्ता

By

Published : Nov 11, 2022, 1:32 PM IST

उरण :महाराष्ट्रातील उरणमधून नौदलाचा कर्मचारी बेपत्ता (Naval base camp in uran) झाला. 11 नोव्हेंबरला उरण येथील INS अभिमन्यू बेस कॅम्पमध्ये शेफ म्हणून काम करणारा नौदलाचा 22 वर्षीय कर्मचारी रायगड जिल्ह्यातून बेपत्ता ( 22 year old Navy officer missing ) झाला. त्याबाबतची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

बेपत्ता असल्याची तक्रार :विशाल महेश कुमार असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो ३ नोव्हेंबरला सकाळी पोहण्यासाठी उरणमधील त्याच्या घरातून निघाला होता. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "विशाल घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी उरण पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल ( Navy officer missing complaint ) केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तपासादरम्यान असे आढळून आले की विशाल 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत उरणमधील एका स्विमिंग पूलजवळ होता. त्याने त्याच्या आईला स्विमिंग पूल परिसरातून फोन केला होता. तपास अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे यांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि विशालच्या मोबाईल लोकेशनवरून, तो उरणपासून अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकाजवळ शेवटचा आढळला होता.

नौदलाकडून संशयास्पद हालचाली उरण सोडण्यापूर्वी विशाल महेश कुमार याने एका दिवसात सुमारे 70,000 रुपयांचा आर्थिक व्यवहार केला होता. नौदल पोलीस कारंजा यांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. नौदलाकडून योग्य सहकार्य मिळत नसून, संबंधित प्रकाराबाबत संशयास्पद हालचाली दिसत असल्याचा आरोप विशाल महेशकुमार यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे. संपूर्ण प्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी : कुटुंबाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीविशालच्या बेपत्ता होण्याबाबत पालकांचा संशय: मिळालेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर रोजी नौदलाच्या बेसकॅम्पमधून (Abhimanyu Base Camp ) उरण शहरातील स्विमिंग पुलवर पोहण्यासाठी आलेला 22 वर्षीय विशाल महेशकुमार हा तरुण अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकाराबाबत नौदलाकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत असून, संबंधित प्रकाराबाबत नातेवाईक संशय व्यक्त करत आहेत. विशाल नौदलामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत असून, नौदलाकडून विशाल हरवल्याची कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. स्विमिंग पुलवर विशालची पार्क करण्यात आलेली मोटारसायकल नौदलाकडून गुपचूप का नेण्यात आली. तसेच विशाल बाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास का टाळाटाळ केली जात आहे? विशाल हरवल्यानंतर मुख्य अधिकारी व विशालचा मित्र अचानक रजेवर का जातात? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळत नसल्याने विशालचे नातेवाईक नौदलाच्या हालचालीबाबत संशय व्यक्त करत आहेत. आता या घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आई-वडिलांचा आत्मदहनाचा इशारा :विशाल बेपत्ता झाल्याला चार दिवस झाले असून, आत्तापर्यंत कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. विशालचा पत्ता लागावा अशी मागणी आई वडीलांकडून करण्यात येत असून, विशालबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही तर आत्मदहन करणार असल्याचेही आई-वडिलांनी म्हटले आहे. नौदलाच्या बेसकॅम्पमधून एक ऑफिसर बाहेर येतो आणि बेपत्ता होतो, यावर नौदलाकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही हे सगळं संशयास्पद असल्याचं नातेवाईक म्हणत असून, याबाबत तात्काळ चौकशी झाली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details