महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त अलिबागमध्ये जनजागृती रॅली - National Voters Day Awakening Rally

राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त आज रायगड जिल्‍ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे. सकाळी अलिबाग शहरात मतदार जनजागृती रॅली काढण्‍यात आली. जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

रायगड
रायगड

By

Published : Jan 25, 2020, 10:35 AM IST

रायगड -राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त आज रायगड जिल्‍ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे. सकाळी अलिबाग शहरात मतदार जनजागृती रॅली काढण्‍यात आली. जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, निवडणूक उपजिल्‍हाधिकारी वैशाली माने उपस्थित होत्‍या.

राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त अलिबागमध्ये जनजागृती रॅली
विविध सामाजिक संस्‍थांच्‍या प्रतिनिधींबरोबरच शहरातील शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी या रॅलीत मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. मतदानासंबंधी जनजागृती करणारे फलक या विद्यार्थ्‍यांच्‍या हातात होते. तसेच मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन करणाऱ्या घोषणादेखील दिल्‍या जात होत्‍या.

हेही वाचा -रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपी निर्दोष

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे पीएनपी नाट्यगृह अलिबाग, येथे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले आहेत. यावेळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आपली कला उपस्थितांसमोर सादर करणार आहेत.

हेही वाचा -रायगड जिल्ह्यासाठी 234 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details