नाना पटोले यांच्याकडून नुकसानग्रस्त नवगाव, वरसोलीची पाहणी; मच्छीमारांच्या जाणून घेतल्या समस्या - nana patole on konkan tour
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज (शनिवार) रायगडमध्ये तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत आहेत. नाना पटोले यांनी नवगाव येथे कोळीवाडा येथे जाऊन जेट्टीवर पाहणी केली. मच्छीमार बांधवांचे वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याबाबत कोळी बांधवाना आश्वासन दिले.
नाना पटोले यांच्याकडून नुकसानग्रस्त नवगाव, वरसोलीची पाहणी
रायगड - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज (शनिवार) रायगडमध्ये तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत आहेत. नाना पटोले यांनी नवगाव येथे कोळीवाडा येथे जाऊन जेट्टीवर पाहणी केली. मच्छीमार बांधवांचे वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याबाबत कोळी बांधवाना आश्वासन दिले. त्यानंतर वरसोली, वावे येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज रायगड दौऱ्यावर आले आहेत. गेटवे येथून मांडवा जेट्टीवर आल्यानंतर नवगाव समुद्रकिनारी नुकसान पाहणीसाठी आले. तौक्ते चक्रीवादळात मच्छिमार बांधवांच्या बोटींचे, जाळ्याचे नुकसान झाले आहे. नवगाव समुद्रकिनारी मच्छिमार बांधवांच्या जाळी व बोटींची पाहणी केली. यावेळी मच्छीमार बांधवांनी समस्यांचा पाढा वाचून वादळानंतर तुम्हीच पहिले नेते पाहणीसाठी आल्याचे सांगितले.
वरसोली येथे नाईक यांच्या वाडीला भेट -
नवगाव येथून नाना पटोले हे वरसोली येथील काँग्रेस नेते रमेश नाईक यांच्या घरी भेट देऊन चौकशी केली. त्यानंतर नाईक यांच्या नारळ, सुपारी बागायतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार माणिक जगताप, महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड श्रद्धा ठाकूर, उपाध्यक्ष प्रवीण ठाकूर, युकव अध्यक्ष अॅड प्रथमेश पाटील, अनंत गोंधळी उपस्थित होते.
Last Updated : May 22, 2021, 4:07 PM IST