महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीद अंतुलेनंतर मुस्लीम तरूण शिवसेनेकडे; अंतुलेंच्या जन्‍मगावी शिवसेनेचा मुस्‍लीम मेळावा - congress

बॅरिस्‍टर अंतुले यांच्‍या आंबेत या जन्‍मगावी झालेल्‍या शिवसेनेच्‍या मुस्‍लीम समाज मेळाव्‍याला जवळपास २ हजार मुस्‍लीम तरूणांनी हजेरी लावली.

नवीद अंतुलेनंतर मुस्लीम तरूण शिवसेनेकडे

By

Published : Apr 15, 2019, 12:18 PM IST

रायगड - रायगडमधील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्‍या ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार सभांमध्‍ये मुस्‍लीम तरूण मोठया संख्‍येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे राष्‍ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्‍यासाठी ही चिंतेची बाब बनली आहे.

नवीद अंतुलेनंतर मुस्लीम तरूण शिवसेनेकडे

बॅरिस्‍टर अंतुले यांच्‍या आंबेत या जन्‍मगावी झालेल्‍या शिवसेनेच्‍या मुस्‍लीम समाज मेळाव्‍याला जवळपास २ हजार मुस्‍लीम तरूणांनी हजेरी लावली. विशेष म्‍हणजे मुस्‍लीम समाजातील महिलाही मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. मुस्‍लीम समाजाकडे व्‍होट बँक म्‍हणून काही लोक पहात होते परंतु त्‍यांची जहागीरी संपली असल्‍याचा टोला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना यावेळी लगावला. आतापर्यंत मुस्‍लीम समाजाला शिवसेनेची भीती दाखवून मुख्‍य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते. परंतु या समाजाने आता या विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात सहभागी व्‍हावे, असे आवाहन नवीद अंतुले यांनी यावेळी केले. यावेळी मतदार संघातील शिवसेनेचे मुस्‍लीम पदाधिकारी, लोकप्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details