महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडात आढळले चिमुरडीच्या मृतदेहाचे २ तुकडे, बलात्काराचा संशय - खून

घरातून बेपत्ता झालेल्या ४ वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे.

घटनास्थळावरील दृश्ये

By

Published : Feb 13, 2019, 11:20 PM IST

रायगड : घरातून बेपत्ता झालेल्या ४ वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. या चिमुरडीची हत्या करून मृतदेह शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात टाकण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

दरम्यान, आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शिळफाटा परिसरातील पटेलनगरमध्ये आडवाटेच्या झुडुपात या चिमुरडीच्या मृतदेहाचे २ तुकडे आढळून आले. चिमुरडीचे धड आणि शीर वेगळे करून झाडीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्‍यात आले होते. चिमुरडीच्या शरीरावर चटके दिल्याच्या अनेक खुणा पोलिसांना आढळून आल्या. यावरुन तिचा नरबळी देण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तिची अवस्था बघून तिच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय पोलिसांना आहे.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. चिमुरडीचे वडील ट्रॅक्टर चालक असून ते मोल-मजुरीही करतात. हे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेश येथील आहे. मंगळवारी सकाळपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. तिच्या घरच्यांनी तिचा शोधही घेतला. मात्र, तिचा कुठेही पत्ता लागला नाही. आज तिच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी या चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतरच हा प्रकार नरबळीचा आहे की तिचा बलात्कार झाला आहे, हे स्पष्ट होईल. चिमुरडीचा खून कुणी आणि का केला असावा, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details