महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : पोलादपूरमध्ये अज्ञातांकडून एका व्यक्तीचा खून - crime news of poladpur

अज्ञातांनी लाठ्या-काठ्याने एखा 55 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना पोलादपूर (जि. रायगड) येथे घडली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jun 1, 2020, 12:14 PM IST

Updated : Jun 1, 2020, 12:26 PM IST

रायगड - पोलादपूर तालुक्यातील गणपत मांढरे (55 वर्षे) यांचा रविवारी (दि. 31 मे) रात्री खून करण्यात आला. गावाबाहेरील शिवमंदिरासमोर लाठ्या-काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर गावात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

मृत गणपत मांढरे
हा खून कुणी केला हे अद्याप समोर आले नसले तरी पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मांढरे यांचा मृतदेह पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर, जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला आहे.

याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा -अरबी समुद्रात वादळाची शक्यता, मासेमारी करण्यास चार जूनपर्यंत बंदी

Last Updated : Jun 1, 2020, 12:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details