रायगड - मुलीशी विवाह करून देत नसल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने एका कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात आई आणि मुलगी जागीच ठार झाली. तर वडील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेखा बळखडे व सुजाता बळखडे, अशी मयत माय लेकीची नावे आहेत. या हत्येबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
आरोपी राहत होता बळखडे कुटुंबाच्या बाजूला-
पनवेल तालुक्यातील दापोली डाऊर येथील चाळीतील कामगार वस्तीत बळखडे हे कुटुंब राहत होते. बळखडे कुटुंबाच्या बाजूलाच आरोपीची खोली आहे. आरोपी हा डंपर चालक म्हणून काम करीत होता. आरोपी याच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे बळखडे याची 18 वर्षीय मुलगी सुजाता बळखडे हिला आरोपीने लग्नासाठी मागणी घातली होती. बळखडे कुटुंबानी आरोपीला लग्नास नकार दिला होता. हा राग आरोपीच्या मनात होता.
लग्नास नकार दिल्यानेच केली हत्या-
बळखडे कुटुंबानी लग्नास नकार दिल्याने आरोपी हा सैरभैर झाला होता. त्यामुळे त्याने बळखडे कुटुंबाचा काटा काढण्याचा निर्धार केला. आरोपीने बळखडे याच्या घरात सकाळी आठ वाजता शिरून आई, मुलगी, वडील यांच्यावर कोयत्याने वार केले आणि खिडकीवाटे फरार झाला. आरोपीच्या वाराने माय लेकीचा जागीच मृत्य झाला. वडील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फरार आरोपीचा शोध सुरू-
दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले माय लेकीचे मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. तर जखमी वडिलांना रुग्णालयात दाखल केले आहे. पनवेल शहर पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पनवेल गुन्हे शाखेची पथके व डॉग स्कॉड रवाना केले आहेत.
पनवेलमध्ये कुटुंबावर चाकूने हल्ला, माय लेकीचा मृत्यू
मुलीशी विवाह करून देत नसल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने एका कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे घडली आहे.
पनवेलमध्ये कुटुंबावर चाकूने हल्ला
हेही वाचा-राज्याचे मंत्री कोरोनाच्या कचाट्यात!