रायगड- जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील महादेवाचा मुरा गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगडमधील मुरा गाव मुलभूत सुविधांपासून वंचित, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
गाव अद्यापही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी नेहमी दुर्लक्षच केले. त्यामुळे ग्रामस्थांनी मतदान करण्याचा निर्यण घेतला आहे.
रायडमधील मुरा गाव मुलभूत सुविधांपासून वंचित
गाव अद्यापही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तसेच अद्यापही गावात जायला रस्ता नाही. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते. यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे मागणी देखील केली. मात्र, त्यांनी प्रत्येकवेळी निष्क्रियता दाखवली. लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी नेहमी दुर्लक्षच केले. त्यामुळे ग्रामस्थांनी मतदान करण्याचा निर्यण घेतला आहे.