खालापूर ( रायगड ) - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला ( Mumbai Pune Highway Tanker Accident ) आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला ( Mumbai Pune Highway Accident Three Death) आहे. हा टँकर पुण्याहून-मुंबईकडे खोपोलीजवळ घडली आहे. दरम्यान, महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजूची वाहतुक थांबवण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर पुणे लेनवर येऊन उलटला. यावेळी टँकरला तीन गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. बोरघाट पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था घटनास्थळी मदत करत आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य केले.