महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तीन नराधमांना कर्जत पोलिसांनी केली अटक

जसखार उरणवरून मानकीवली येथे जाण्यासाठी १० मे रोजी पीडित महिला व त्याचे पती कर्जत येथील भिसेगाव रिक्षा स्टँड येथे आले.

तीन आरोपी अटकेत

By

Published : May 11, 2019, 11:26 PM IST

रायगड - एका विवाहित महिलेला पतीच्यासमोर चालत्या ट्रेनमधून खाली उतरवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची घटना कर्जतमध्ये घडली होती. याबाबत सूरज अमरदिप चव्हाण, (रा. भिसेगाव), अजय प्रताप राठोड (रा. क्रांती नगर झोपडपट्टी), बबलू अशोक सिंग (रा. पुलाची वाडी - किरवली) या तीन नराधमांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

तीन आरोपी अटकेत

जसखार उरणवरून मानकीवली येथे जाण्यासाठी १० मे रोजी पीडित महिला व त्याचे पती कर्जत येथील भिसेगाव रिक्षा स्टँड येथे आले. तिथून रात्री १०.४० च्या खोपोली ट्रेनने कर्जतवरून ती महिला पतीसह खोपोलीला जायला निघाले. ते ट्रेनमध्ये बसले त्याचवेळी कर्जत क्रांती नगर झोपडपट्टीत राहणारा सूरज व त्याचा जोडीदार चालत्या ट्रेनमध्ये ती महिला ज्या डब्यात बसली होती त्या डब्ब्यात चढले. यावेळी ट्रेनच्या डब्यात त्यांच्याशिवाय कोणी प्रवासी नव्हते. याचा फायदा घेऊन ट्रेन सुरू झाल्यावर सूरज व त्याचा जोडीदार याने त्या महिलेच्या पतीला मारहाण करू लागले. दरम्यान पळसदरी रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली असता त्या दोघांनी त्या महिलेला फलाटावर ढकलून दिले. त्यावेळी सूरजसुद्धा उतरला मात्र त्याच्या जोडोदाराने त्या महिलेच्या पतीला फलाटावर उतरण्यास मज्जाव केला. ट्रेन सुरू झाल्यावर मात्र त्या दुसऱ्या साथीदाराने चालती ट्रेन सोडली. पळसदरी रेल्वे स्थानकातून त्या महिलेला सुरजने हाताला धरून खेचत बाहेर नेले. रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका मुलगा मोटारसायकल घेवून उभा होता. त्या तिघांनी त्या महिलेला पळसदरीच्या जंगल परिसरातील वेताळ मंदिराजवळ नेऊन सुरज याने त्या महिलेवर बलात्कार केला.

दरम्यान या महिलेचा पती केळवली स्थानकावर उतरला. त्यावेळी केळवली येथून भजन कीर्तन आटपून घरी निघालेले वकील राजेंद्र येरुणकर यांना त्या पीडित महिलेचे पती दिसले त्यांनी एवढ्या रात्री एकडे कसा असे विचारले तेव्हा त्याने झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी येरुणकर यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना रात्री १२ च्या सुमारास फोन करून घटनेची माहिती दिली. नाईट राऊंडला असलेल्या पोलीस निरीक्षक तानवडे यांनी दोन कर्मचाऱ्यांच्या चार टीम तयार करून शोधण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत वकील राजेंद्र येरूणकर, भिसेगाव पोलीस पाटील संजय हजारे स्वतः होते. अवघ्या दीड तासात पोलिसांना त्याचा शोध घेण्यात यश आले. पोलिसांनी त्या तिघांना रात्रीच ताब्यात घेतले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सूरज अमरदिप चव्हाण, (रा. भिसेगाव), अजय प्रताप राठोड (रा.क्रांती नगर झोपडपट्टी), बबलू अशोक सिंग (रा. पुलाची वाडी - किरवली) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details