महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुमारे चार तासांनंतर मुंबई-गोवा महामार्ग सुरू; रात्री कशेडी घाटात कोसळली होती दरड - Rajesh Bhostekar

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग रात्री बंद झाला होता. सुमारे चार तासांच्या परिश्रमानंतर मुबई-गोवा महामार्ग सुरळीत झाला आहे.

मातीचा ढिग हटवतानाचे छायाचित्र

By

Published : Aug 3, 2019, 1:40 AM IST

Updated : Aug 3, 2019, 7:42 AM IST

रायगड- मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात मौजे धामणदेवी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला होता. तत्काळ प्रशासनाने दरड काढण्याचे काम सुरू केले होते. सुमारे चार तासांच्या परिश्रमानंतर मुबई-गोवा महामार्ग सुरळीत झाला आहे.

चार तासांनंतर मुंबई-गोवा महामार्ग सुरू


काल (शुक्रवारी) दुपारपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबई गोवा महामार्गावर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात मौजे धामणदेवी येथे दरड कोसळून भला मोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर आला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मुंबई व कोकणात जाणारी व येणारी वाहतुक ठप्प झाली होती. पहाटे सुमारे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास महामार्ग सुरळीत झाला आहे.

Last Updated : Aug 3, 2019, 7:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details