महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला अटक - रायगड लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला अटक

नागाव येथील एका कॉटेजसाठी रोहित्र बसविण्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला रायगडच्या लाचलुचपत विभागाने जेरबंद केले आहे.

महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला अटक
महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला अटक

By

Published : Jun 1, 2021, 10:19 PM IST

रायगड - नागाव येथील एका कॉटेजसाठी रोहित्र बसविण्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला रायगडच्या लाचलुचपत विभागाने जेरबंद केले आहे. अतुल मोरे (वय ३२) असे लाचखोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अभियंत्याचे नाव आहे. साडे सात हजार रुपये लाच घेताना अलिबाग येथील चेंढरेमधील महावितरण कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे.

अंदाजपत्रक देण्यासाठी मागितली होती लाच
या प्रकरणातील तक्रारदार हे महावितरणचे ठेकेदार आहेत. नागाव येथील एका कॉटेजला रोहित्र बसविण्यासाठी त्यांनी अंदाजपत्रक तयार करुन देण्यासाठी अर्ज केला होता. हे अंदाजपत्रक तयार करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून त्यांनी साडेसात हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. याबाबतची तक्रार रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविण्यात आली होती.

साडे सात हजार स्वीकारताना मोरे जाळ्यात
तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी नागाव येथे जाऊन लाचलुचपत विभागाने केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलिबाग चेंढरे येथे असलेल्या महावितरण कार्यालयात सापळा रचला. आरोपी हे पेण येथील कार्यालयात कामानिमित्त गेले होते. ते अलिबाग चेंढरे कार्यालयात आल्यानंतर आरोपी मोरे यांनी तक्रारदार यांना फोन करून बोलावले. तक्रारदार हे कार्यालयात आल्यानंतर साडे सात हजार रुपये लाच दिली. त्याचवेळी सापळा लावलेल्या लाचलुचपत पथकाने आरोपी अतुल मोरे याना रंगेहाथ पकडले आणि साडेसात हजार रुपयांची लाच स्वीकारतांना जेरबंद केले.

या पथकाने केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनवणे, पोलीस हवालदार दीपक मोरे, विशाल शिर्के, महेश पाटील यांचा पथकाने ही कारवाई केली. अलिबाग चेंढरे येथील महावितरणच्या कार्यालयात संध्याकाळी साडे सहा वाजताही कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details