रायगड- गेल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. अलिबाग, पेण तालुक्यांत ८५० उच्चदाब वाहिन्या, २,७०० लघुदाब वाहिन्या आणि ५७ ट्रान्सफॉर्मर पडले आहेत. जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी कार्यरत असून नागरिकांचीही मदत घेतली जात आहे.
जिल्ह्यातील असुम उसर सोडता सर्वच उपकेंद्रे सुरू झाली आहेत. आतापर्यंत अलिबाग, पेण शहर, रेवस, सांगाव येथील फिडर सुरू करण्यात आले आहे. या भागातील वीजपुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, अशी माहिती अलिबाग-पेणचे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांनी दिली. नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ : शरद पवार उद्या रायगड दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी