महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : खारेपाट विभागाला एक वर्षात पिण्याचे पाणी देण्याची खासदार सुनील तटकरेंची घोषणा - रायगड ताज्या बातम्या

खारेपाट विभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून तो येत्या एक वर्षाच्या आत सोडवणार असल्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

Sunil Tatkare latest news
रायगड : खारेपाट विभागाला एक वर्षात पिण्याचे पाणी देण्याची खासदार सुनील तटकरेंची घोषणा

By

Published : Jun 18, 2021, 9:19 PM IST

पेण (रायगड) -पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून तो येत्या एक वर्षाच्या आत सोडवणार असल्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले. तसेच पेणमधील ग्रामपंचायती विकासकामांच्या माध्यमातून श्रीमंत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पेण तालुक्यातील वडखळ, आमटेम, डोलवी, गडब, मळेघर या पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

पाण्याचा प्रश्न येत्या वर्षभरात सोडवण्याची घोषणा -

पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल, डोलवीचे सरपंच वनिता अनिल म्हात्रे, आमटेमचे सरपंच योगीता तांबोळी, मळेघरचे सरपंच शरद पाटील व गडबचे सरपंच अपर्णा कोठेकर यांच्यासह त्यांच्या अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी आज खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी पेण तालुक्यातील विकासकामांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. खारेपाट भागातील पाण्याचा प्रश्न येत्या वर्षभरात सोडवण्याची घोषणादेखील केली. आयुष्यात आपण विकासकामात कधीच राजकारण केले नसून जलसंपदा मंत्री असताना पेणमधील जमीन कालव्यांच्या माध्यमातून ओलिताखाली आणण्याचे काम केले असल्याची आठवणदेखील त्यांनी करून दिली. तसेच ज्या जनतेने मला थेट सरपंच आणि आता अविश्वास ठराव झाल्यानंतरच्या मतदानातदेखील माझ्यावर विश्वास दाखवला, त्या जनतेची कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्याची ताकद पक्षाने द्यावी. तसेच या भागातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा, असे वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांनी म्हटले.

हेही वाचा- अँटिलिया स्फोटक प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; 'हे' आहेत खलनायक

ABOUT THE AUTHOR

...view details