महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुरुड रोहा औषध निर्मिती प्रकल्पासाठी स्थानिकांच्या प्रश्नासाठी आग्रही भूमिका - खासदार सुनील तटकरे - मुरुड रोहा औषध निर्मिती प्रकल्प

रोहा मुरुड परिसरात औषध निर्माण प्रकल्प होत असताना तेथील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार यांचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. येणाऱ्या प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

mp-sunil-tatkare-
mp-sunil-tatkare-

By

Published : Jun 18, 2021, 5:30 PM IST

Updated : Jun 18, 2021, 5:44 PM IST

रायगड -रोहा मुरुड परिसरात औषध निर्माण प्रकल्प होत असताना तेथील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार यांचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. येणाऱ्या प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. या परिसरात येणारा औषध निर्मिती प्रकल्प हा प्रदूषण विरहित प्रकल्प आहे. त्यामुळे येथील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार आणि स्थानिकांच्या नोकरीच्या प्रश्नासाठी आग्रही पद्धतीची भूमिका आम्ही मांडली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी औषध निर्मिती प्रकल्पाबाबत दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुड या तालुक्यात 17 गावातील जमिनीवर औषध निर्मिती प्रकल्प राज्य शासन उभारणार आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार महेंद्र दळवी हे उपस्थित होते. 17 गावातील स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. याबाबत खासदार सुनील तटकरे यांना पेण वडखळ येथे कार्यक्रमास आले असता विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. पेण तालुक्यातील वडखळ, मळेघर, डोलवी, गडब, आमटेम येथील पाच विद्यमान सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमानंतर खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार सुनील तटकरे
मुरुड रोहा येथे औषध निर्मित प्रकल्प उभारणार -
मुरुड, रोहा तालुक्यातील 17 गावात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 30 हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात होणार असून 75 हजार लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. हा प्रकल्प कसा असणार आहे याबाबत सादरीकरण उद्योग मंत्रालयाकडून करण्यात आले. औषध निर्मित प्रकल्प हा प्रदूषण विरहित प्रकल्प आहे. येथील शेतकरी, मच्छीमार, बागायतदार, स्थानिक तरुणांच्या नोकरीचा प्रश्न याबाबत आम्ही आग्रही भूमिका या बैठकीत मांडली आहे. मुख्यमंत्र्यांनीही सर्व समावेक्षक विचार करण्याची स्पष्टता दिली असून त्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळण्याचा निर्णय होईल असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार -
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. येणाऱ्या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. असे सूचक उत्तर खासदार सुनील तटकरे यांनी नाना पटोले याच्या स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रश्नाबाबत उत्तर दिले.
अलिबाग विरार कॅरिडॉरबाबत शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणार -
अलिबाग विरार या कॅरिडॉरला स्थानिक शेतकऱ्याचा विरोध आहे. येथील शेतकऱ्यांना जमीन भूसंपादनासाठी नोटीसी आल्या आहेत. शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत पालकमंत्री अदिती तटकरे पुढील आठवड्यात बैठक घेणार आहेत. नक्की हा प्रकल्प काय आहे हे शेतकऱ्यांना कळले पाहिजे, भविष्यात हा प्रकल्प वाहतुकीची जोडणी करणारा प्रकल्प आहे. शेतकऱ्याचा नक्की याला का विरोध आहे, ही भूमिकाही जाणून घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीराजे आणि बाळासाहेब आंबेडकर याच्या भेटीतून नवे समीकरण नाही -
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे राजकारण विरहित सामाजिक चळवळ म्हणून बघत आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा मूक आंदोलनाला पाठींबा दिला. मात्र या दोघांच्या एकत्रित येण्यातून कुठेतरी नवे राजकीय समीकरण घडेल असे कुठेही दिसत नाही. अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
Last Updated : Jun 18, 2021, 5:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details