रायगड- रोहा, मुरुड येथे येत असलेला बल्प फार्मा पार्क हा प्रकल्प रासायनिक नाही. मी आतापर्यंत कधीच दुट्टपी भूमिका घेतलेली नाही. शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यांना प्रकल्पाबाबत माहिती दिली जाणार असून त्याचा विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांसोबत राहणार. खासदार म्हणून रोजगार निर्मिती करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रोहा-मुरुडमध्ये येणारा फार्मा पार्क प्रकल्प रासायनिक नाही - खासदार सुनील तटकरे - खासदार सुनील तटकरे रोहा मुरुड प्रकल्प
शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यांना प्रकल्पाबाबत माहिती दिली जाणार असून त्याचा विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांसोबत राहणार. खासदार म्हणून रोजगार निर्मिती करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी रोहा मुरुड प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पेण, अलिबाग रेल्वे, उरण कोळीवाडा, जेएनपीटी प्रश्न, आरसीएफ प्रश्न, मुंबई-गोवा महामार्ग, सागरी महामार्ग, जेट्टी प्रकल्प याबाबत केंद्रीय मंत्र्यांना भेटून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रश्न सोडविण्याबाबत आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
भाजप जिल्हाध्यक्षांच्या आरोपांना दिले तटकरे यांनी उत्तर
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहिते यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर रासायनिक प्रकल्पाबाबत दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. रोहा मुरुड येथे येत असलेला फार्मा पार्क हा रासायनिक नाही. मी कधीही दुट्टपी भूमिका घेतलेली नाही. शेतकऱ्यांना या प्रकल्पाबाबत काहीजण चुकीची माहिती दिली जात आहे. शेतकऱ्यांना प्रकल्प नको असेल तर आम्ही शेतकाऱ्यांसोबत आहोत, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे.