महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्यथा लॉंग मार्चशिवाय पर्याय नाही - खासदार छत्रपती संभाजी राजेंचा सरकारला इशारा - रायगड संवाद यात्रा

संवाद यात्रेच्या निमित्ताने समाज बांधवाशी संवाद साधताना खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, आधीच्या मुख्यमंत्र्यानी जे केले, तेच आता हे राज्य सरकार करीत आहे. एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. माझ्यावर भाजपचे लेबल लावले आहे. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून खासदार आहे.

छत्रपती संभाजी राजे
छत्रपती संभाजी राजे

By

Published : Oct 26, 2021, 5:17 PM IST

Updated : Oct 26, 2021, 5:41 PM IST

रायगड-छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरू केली. रायगड जिल्ह्यातून या संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. खालापुरात वावोशी व खोपोली शहरमध्ये सभा आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी अजून वेळ गेली नाही, असे म्हटले आहे. अन्यथा लॉंगमार्चचा निर्णय घेतला जाईल, असा केंद्र व राज्य सरकारला इशारा दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरून आरक्षण मागत मागत आहेत. जवळपास 58 मुक मोर्चे काढण्यात आले. 9 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले. तेव्हापासून छत्रपती संभाजी राजे यांनी पुन्हा महाराष्ट्रात समाजबाधवांच्या भेटींसाठी दौरा सुरू केला.

हेही वाचा-मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट, राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असणार उपस्थित


संवाद यात्रेच्या निमित्ताने समाज बांधवाशी संवाद साधताना खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, आधीच्या मुख्यमंत्र्यानी जे केले, तेच आता हे राज्य सरकार करीत आहे. एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. मी भाजपच्या कोट्यातून झालेला खासदार आहे. म्हणून माझ्यावर भाजपचे लेबल लावले आहे. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून खासदार आहे. मी भाजपचा असतो, तर मला हाऊसमध्ये आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती. पण मला बोलू दिले नाही. तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने मदत केली. सारथी शिक्षण संस्थेला मदत करा, यासारख्या छोट्या मागण्या आहेत. तरीही यावर विचार होत नसल्याने आम्हाला ही संवाद यात्रा काढावी लागली.


हेही वाचा-मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती खासदार संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सर्व पक्षांचे प्रतिनिधी होते उपस्थित

राज्य सरकारला जागे करण्यासाठी रायगडच्या भूमीतून सुरुवात करण्यात आली. त्यांनी खालापूर व खोपोली शहराला भेट दिली. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करीत फटाक्यांची आतषबाजी करीत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. वावोशी येथे झालेल्या सभेसाठी रायगड मराठा आरक्षण समिती समन्वयक विनोद साबळे, वैभव वाभले, माजी नगराध्यक्ष तथा समन्वयक सुनील पाटील, राजीप सदस्य नरेश पाटील, विजय पाटील, आर एस पाटील , शंकर माणकवले, सुरेश पाटील, करण गायकर, अंकुश कदम, राजेंद्र कोंदे, राजेंद्र गावडे, किशोर पाटील, भूषण पाटील, शेखर पिंगले, खालापूर तालुका सन्वयक शशिकांत मोरे, अशोक मराजगे, महेश पाटील, प्रशांत खांडेकर यासह अन्य मान्यवर होते.

हेही वाचा-मराठा आरक्षण मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

खालापूर खोपोलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जंगी स्वागत

पालिफाटा येथे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत खालापुर विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे त्यांनतर शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. याठिकाणीही जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर खोपोली शहरातून मुख्य बाजारपेठतrन ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत दर्शन घेतले. यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराक्षा विनिता औटी कांबळे, गटनेते सुनील पाटील, मंगेश दळवी, नगरसेविका वैशाली जाधव, प्रमिला सुर्वे, माधवी रिठे, माजी उपनगराध्य रमेश जाधव, संतोष मालकर, अविनाश तावडे, मधुकर दळवी, औटी, जयवंत पाटील, हरिष काळे, ईदरमल खंडेलवाल, हेमंत नांदे, शोभा काटे, दिलीप पवार यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Last Updated : Oct 26, 2021, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details