महाराष्ट्र

maharashtra

रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीला पहिल्यांदाच खासदारांची उपस्थिती

By

Published : Feb 6, 2021, 3:48 PM IST

रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि रायगडचा भाग असलेले मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे दोघेही 'रायगड जिल्हा नियोजन समिती' बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक
रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक

रायगड - रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात होत आहे. आजच्या बैठकीचे विशेष म्हणजे पहिल्यांदाच जिल्ह्याचे दोन्ही खासदार या बैठकीला हजर राहिले आहेत. रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि रायगडचा भाग असलेले मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे दोघेही या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समिती बैठकीला खासदार उपस्थित राहिल्याने बैठक चांगलीच चर्चेत आली आहे.

कोरोना माहामारीनंतर वर्षभराने जिल्हा नियोजन बैठक-

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षस्थान हे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठक कोरोना माहामारीनंतर वर्षभराने होत आहे. या बैठकीला जिल्ह्याचे आमदार, राजीप अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित असतात. तर खासदार यांनाही या बैठकीचे निमंत्रण असते. मात्र आतापर्यंत एकदाही जिल्ह्याचे खासदार या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. पहिल्यांदाच रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे बैठकीला उपस्थित राहिले असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या.

खासदार बैठकीला न येण्याची परंपरा मोडीत-

आतापर्यंत अनेक जिल्हा नियोजन समिती बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडल्या आहेत. सुनील तटकरे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनंत गीते हे खासदार होते. मात्र पालकमंत्री सुनील तटकरे याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समिती बैठकीला खासदार अनंत गीते हे येत नव्हते. तर दिशा बैठक ही जिल्ह्याचे खासदार यांच्या अध्यक्षतेखाली होत असते. तेव्हा सुनील तटकरे येत नव्हते. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, अशी महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडीत असल्याने रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीचे चित्र आता पालटले आहे. जिल्ह्याच्या दोन्ही खासदारांनी जिल्हा नियोजन समितीला हजेरी लावल्याने खासदार बैठकीला न येण्याची परंपरा मोडीत काढली आहे.

हेही वाचा-सरकार स्थिर, फडणवीसांना पाच वर्षे स्वप्न पाहावी लागणार- सुभाष देसाई

ABOUT THE AUTHOR

...view details