महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोटर सायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने केले जेरबंद - रायगड पोलीस बातमी

रायगड जिल्ह्यातील मोटर सायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने जेरबंद केले आहे.या प्रकरणी अलिबाग आणि उत्तराखंड येथून चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

Motorcycle thieves arrested by local crime investigation department
मोटर सायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने केले जेरबंद

By

Published : Mar 9, 2021, 7:49 PM IST

रायगड - जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, पेण तालुक्यातून मोटर सायकल चोरी करणारी टोळी रायगड पोलीसांनी जेरबंद केली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाच्या पथकाने या प्रकरणी अलिबाग आणि उत्तराखंड येथून चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. एकूण ३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

मोटर सायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने केले जेरबंद

जिल्हा पोलिस अधिक्षकांचे स्थानिक गुन्हे विभागला आदेश -

रायगड जिल्ह्यात मोटर सायकल चोरीच्या घटनामध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस अधिक्षक अशोक दुधे आणि अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी मोटरसायकल चोरांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली या मोटरसायकल चोरांचा शोध घेण्यास सुरवात केली होती. दोन पथके स्थापन करून मोटरसायकल चोरांचा तपास सुरु केला होता.

अलिबाग आणि उत्तराखंड मधून चार जण अटकेत -

सातत्यपुर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी संकेत जामकर आणि संकेश जाधव दोन जणांना थळबाजार येथून ताब्यात घेतले. चौकशीनंतर अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण येथील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १ बुलेट, १ पॅशन प्रो, १ टिव्हीएस एन्टॉक, १ सुझुकी बॅगमॅन स्ट्रीट आणि एक यामाहा एफ झेड अशा पाच दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या. तपासादरम्यान आणखिन दोन आरोपी निष्पन्न झाले. त्यांना उत्तराखंड येथून ताब्यात घेण्यात आले. शुभम कश्यप आणि आशीष पन्वार अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून बुलेट, पॅशन प्रो आणि पल्सर अशा ३ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

यांनी केली कारवाई -

पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उप निरीक्षक महेश कदम, साहाय्यक फौजदार सी. बी. पाटील, पोलीस हवालदार बंधू चिमटे,पोलीस हवालदार हणमंत सुर्यवंशी, अमोल हंबीर, सचिन शेलार, परेश म्हात्रे, प्रतिक सावंत देवराम कोरम, अनिल मोरे यांनी या तपासात महत्वाची भुमिका बजावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details