रायगड -कोरोनाच्या या संकटकाळात आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची परिस्थितीही घारी सारखी झाली आहे. असे असले तरी कोरोनाच्या कठीण परिस्थितीत आरोग्य यंत्रणेतील महिला डॉक्टर, आरोग्य सेविका आपली कुटूंब आणि रुग्णालयातील सेवेची जबाबदारी चोख बजावत आहेत. आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिजिशियन डॉ. अपूर्वा सौरभ पाटील यांच्या कार्याचा घेतलेला 'ई़टीव्ही भारत' ने घेतलेला आढावा.
दीड वर्षांपासून करीत आहेत कोविड रुग्णांवर उपचार
मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि सगळीकडे हाह:कार माजला. रायगड जिल्ह्यातही कोरोनाने पाय पसरवण्यास सुरुवात केली आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी 2020 पासून डॉ. अपूर्वा सौरभ पाटील ह्या रुजू झाल्या. त्यानंतर मार्च 2020 पासून कोरोना सुरु झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या एका योद्धा प्रमाणे रुग्णावर उपचार करीत आहेत.
दीड वर्षाच्या मुलाला घरी ठेवून रुग्णसेवा