महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमधील खालापूर तालुक्यात घराला भीषण आग, आईसह मुलगा बेपत्ता - आई मुलगा

या आगीच्या घटनेत आई आणि मुलगा बेपत्ता झाले असून मुलगी आणि वडील बचावले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेत आई आणि मुलगा बेपत्ता होण्यामागे घातपाताचा तर प्रकार नाही ना. की ते जजळून खाक झाले, याबाबत संशय निर्माण झाला आहे.

घटनास्थळावरील दृश्य

By

Published : Jul 4, 2019, 11:53 AM IST

रायगड - खालापूर तालुक्यातील बीड गावात एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत आई आणि मुलगा बेपत्ता झाले असून मुलगी आणि वडील बचावले आहेत. आगीची ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. आई आणि मुलाचा शोध ग्रामस्थ व पोलीस घेत आहेत.

या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेत आई आणि मुलगा बेपत्ता होण्यामागे घातपाताचा तर प्रकार नाही ना. की ते जजळून खाक झाले, याबाबत संशय निर्माण झाला आहे.

घटनास्थळावरील दृश्य

बीड गावातील भानुदास हरिचद्रं पाटील यांच्या जुन्या लाकडी घराला रात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. भानुदास हे रात्र पाळीला गेले होते. घरात पत्नी रंजना पाटील, मुलगी स्नेहा पाटील (१९), मुलगा सुनील पाटील हे घरात झोपले होते. आग लागल्यानंतर स्नेहा पाटील हिने जळत्या आगीतून पहिल्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे ती बचावली. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

आग लागल्यानंतर घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग अजून भडकली आणि घर जळून बेचिराख झाले. मात्र, या घटनेनंतर रंजना पाटील आणि सुनील यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थ आणि पोलिसांनी त्या दोघांचा घराच्या राखेत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या जळलेल्या घराचा पडलेला ढिगारा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details