रायगड - स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनी भरती प्रक्रिया करीत आहेत. याविरोधात अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली 28 ऑक्टोबरला आरसीएफ कंपनी समोर जन आंदोलन केले जाणार आहे. आरसीएफ कंपनीने प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून भरती प्रक्रिया पूर्ण करीत आहे. याबाबत आमदार महेंद्र दळवी यांनी आज राजमाला येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरसीएफ प्रकल्पग्रस्तांसाठी डावलून नोकरभरती; आता आरपारची लढाई - आमदार महेंद्र दळवी - raigad latest news
आरसीएफ प्रकल्पग्रस्तांसाठी आरपारची लढाई लढण्याची भूमिका आमदार महेंद्र दळवी यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर 28 ऑक्टोबरला आरसीएफ कंपनी समोर जन आंदोलन करण्यात येणार आहे प्रकल्पग्रस्तांना डावलून कंपनीची परस्पर भरती होत असल्याची आमदार महेंद्र दळवी यांची माहिती
आमदार महेंद्र दळवी
थळ येथे 1980 साली आरसीएफ खत निर्मित प्रकल्प कंपनी उभी राहिली. कंपनीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपली जमीन प्रकल्पसाठी दिली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना कंपनीत सामावून घेतले जाणार असे आश्वासन दिले. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले असले तरी अद्यापही 143 प्रकल्पग्रस्त गेली 40 वर्ष नोकरिपासून वंचित राहिले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी अनेक आंदोलने, मोर्चे कंपनीसमोर काढण्यात आले. मात्र आजही प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हा अधांतरीत राहिला आहे.