महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारी नोकरभरती करताना वयोमर्यादेत वाढ करा, आमदार दळवी यांची मागणी - रायगड बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात भरती प्रक्रिया राबवताना इच्छुक उमेदवारासाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात यावी, अशी मागणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

आमदार दळवी
निवेदन देताना आमदार दळवी

By

Published : Jun 25, 2021, 12:57 AM IST

Updated : Jun 25, 2021, 6:27 AM IST

रायगड -सरकारी नोकरभरती करताना बहुतांश वेळा नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांचे वयोमर्यादा 25 असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात भरती प्रक्रिया राबवताना इच्छुक उमेदवारासाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात यावी, अशी मागणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

बोलताना आमदार दळवी

आमदार दळवी यांनी बुधवारी (दि. 23 जून) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश शिंदे हे देखील उपस्थित होते.

कोरोनामुळे दोन वर्षे तरुणांची गेली वाया

कोरोना काळात मागील दोन वर्षे सरकारी भरत्या झालेल्या नाहीत. त्यामुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेले सर्वजण निराश झाले आहेत. सरकारी नोकर भरती करताना इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा 25 वय वर्षे असते. मात्र, कोरोना काळात भरती न झाल्यामुळे सुरुवातीच्या काळात ज्यांचे वय 25 वर्षे होते, ती मुलंं आता 27 वर्षांची झाली आहेत.

शासकीय नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवा

या मुलांवर अन्याय होऊन ते सरकारी नोकरीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे अशा तरुणांनाही नोकरीची संधी मिळायला पाहिजे. यासाठी आगामी काळात होणार्‍या सरकारी नोकरभरतीमध्ये वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविल्यास सर्वांना समान लाभ घेता येईल, असे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jun 25, 2021, 6:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details