रायगड- पेण तालुक्यातील वरसई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी ती नजर चुकवून शाळेतून बाहेर पडली होती. या प्रकरणी ती हरवल्याची तक्रार पेण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; नातेवाईकांनी व्यक्त केला संशय - विद्यार्थीनी आत्महत्या रायगड
पेण तालुक्यातील वरसई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तिचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत जावळी येथील जंगल भागात सापडला.
शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या
हेही वाचा-'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच'
गुरुवारी जावळी येथील जंगल भागात तिचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत सापडला. मृत मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी सांगितले आहे.