रायगड - शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगत, केंद्र सरकार या प्रकरणी हट्टवादी भूमीका घेत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये केला. शेतकऱ्यांना जे अडचणीचे वाटते, त्या कायद्यात दुरुस्ती केली असती तर ही वेळ आली नसती, असे पाटील म्हणाले.
शेतकरी आंदोलन प्रकरणी केंद्र सरकार हट्टवादी - जयंत पाटील
केंद्र सरकार कृषी कायद्याप्रकरणी हट्टवादी भूमीका घेत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये केला.
शेतकरी आंदोलन प्रकरणी केंद्र सरकार हट्टवादी - जयंत पाटील
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते माणगाव येथील सुसज्य व अद्याययावत अशा जलसंपदा भवन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये जलसंपदा विभागाच्या, जलसंपदा भवनाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकणातील प्रलंबीत प्रकल्पांना चालना देण्याचे काम आघाडी सरकार करेल असे आश्वासन पाटील यांनी दिले.
मुख्यमंत्री मुद्यावर बोलायचे नाही
मुख्यमंत्री होण्याच्या मुद्द्यावर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, स्थानिक खाजगी वाहीनीला दिलेल्या मुलाखतीमधील एकच मुद्दा प्रसार माध्यमांनी वापरला. पण माझी तशी कोणतीच भूमिका नाही. पक्षश्रेष्ठींना त्याची कल्पना आहे. त्यामुळे आता पुन्हा त्या मुद्द्यावर बोलायचे नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी रायगडमध्ये बोलताना दिले.
जीएसटी केंद्राने न दिल्याने अर्थसंकल्प सादर करताना अडचण
केंद्र सरकारने अद्याप जीएसटीचे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अडचण येणार आहे. आपले दुकाने कसे चालेल आणि राज्य सरकार कसे अडचणीत येतील, अशी मानसिकता केंद्र सरकारने ठेऊ नये, असा सल्ला पाटील यांनी केंद्राला दिला. केंद्राने चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार भरडली जात असल्याने एक वेगळ्या प्रकारची अडचण राज्य चालवताना निर्माण होत असल्याचे पाटील यांनी सांगतले.