लष्कराचा रणगाडा अलिबागमध्ये दाखल; पर्यटकांचे ठरणार आकर्षण - military tank on alibaug seashore
अलिबागच्या समुद्रकिनार्यावर 37 टन वजनाचा भव्य रणगाडा बसवण्यात येणार आहे. यामुळे किनाऱ्यावरील सौंदर्यांत भर पडणार आहे. आज खडकी(पुणे) येथील लष्करी कॅम्प मधून हा रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला. लवकरच समारंभपूर्वक या रणगाड्याचे लोकार्पण होणार असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.

लष्कराचा रणगाडा अलिबागमध्ये दाखल; पर्यटकांचे ठरणार आकर्षण
रायगड - अलिबागच्या समुद्रकिनार्यावर 37 टन वजनाचा भव्य रणगाडा बसवण्यात येणार आहे. यामुळे किनाऱ्यावरील सौंदर्यांत भर पडणार आहे. आज खडकी (पुणे) येथील लष्करी कॅम्पमधून हा रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला. लवकरच समारंभपूर्वक या रणगाड्याचे लोकार्पण होणार असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.
लष्कराचा रणगाडा अलिबागमध्ये दाखल; पर्यटकांचे ठरणार आकर्षण
अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे. अलिबागला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला असल्याने त्याच्या सौंदर्यांत भर पडली आहे. अलिबागचे हेच निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारी फिरण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करते. आता लवकरच या किनार्यावर 'वॉर ट्रॉफी' म्हणून संबोधण्यात येणारा रणगाडा बसवण्यात येणार आहे. कारगिलसह अनेक युद्ध गाजवणारा हा 'ट्रॉफी' रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे.
लष्कराचा रणगाडा अलिबागमध्ये दाखल; पर्यटकांचे ठरणार आकर्षण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पनारायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ही कल्पना मांडली होती. अलिबागच्या समुद्रात असलेला कुलाबा किल्ला तसेच जिल्ह्याला असलेले ऐतिहासिक महत्त्व यादृष्टीने सूर्यवंशी यांनी ऐतिहासिक रणगाडा किंवा तोफ बसवण्यास पुढाकार घेतला. यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालायशी संपर्क करून प्रस्ताव पाठवण्यात आला. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर हे पूर्णत्वास आले. रणगाडा लावण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मांडलेली संकल्पना सत्यात उतरली आहे.टिकेटी 55 ट्रॉफी रणगाडा तोफटीकेटी 55 प्रकारचा ट्रॉफी रणगाडा तोफ आहे. तिची लांबी 28 फूट असून रूंदी 12 फुट आहे. या तोफेचे वजन 37 टन आहे. रणगाडा बसवण्यासाठी अलिबाग समुद्रकिनार्यावर चौथरा बांधण्यात आलाय. सध्या हा रणगाडा चौथऱ्यावर बसवण्यात आला असून लवकरच समारंभ करून त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.