खालापूर (रायगड) -आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत शेकाप कोणाबरोबर आघाडी करणार याचा निर्णय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य वेळी घेतला जाईल. मात्र रायगड जिल्ह्यात शेकापच केंद्रस्थानी असून शेकाप शिवाय कोणताही राजकीय पक्ष सत्ता काबीज करू शकत नाही, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस व आमदार जयंत पाटील यांनी केले. व खोपोली - खालापूर शेकाप कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.
आगामी निवडणुकीमध्ये शेकापच केंद्रस्थानी असणार - जयंत पाटील - शेकाप कार्यकर्ता मेळावा
आम्ही कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. लढतो ते समोरासमोर लढतो कारण शेकाप शक्ती ही सामान्य माणूस आहे. दलित वंचीत व शेतकरी - कष्टकरी वर्गाचा आवाज शेकाप असल्याने आपली बांधीलकी त्यांच्याशी असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपा व केंद्र सरकारवर सडकून टीका करून वर्तमान भाजपा पक्ष पाट लावून आलेल्या उसन्या नेत्यांचा कोणतेही ध्येय धोरण नसलेला राजकीय पक्ष बनल्याचे सांगितले.
यावेळी धैर्यशील पाटील बोलताना म्हणाले निवडणुकीतील जय पराजय महत्वाचा नसून, शेकाप सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कायम कटिबद्ध आहे. याही पुढे राहणार आहे हे महत्वाचे असल्याचे सांगितले. विकास होत असताना त्या विकासाच्या पायाखाली येथील गरीब कष्टकरी व शेतकऱ्यांचा जीव जाणार नाही. यासाठी शेकाप पक्ष कार्यरत राहील व गरज पडल्यास संघर्ष करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आमदार जयंत पाटील यांनी विस्तृतपणे पक्षाची राजकीय वाटचाल व आगामी रणनीतीबाबत माहिती दिली. संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा खोपोली - खालापूर तालुक्यात शेकाप कोणाबरोबर आघाडी करणार या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्वबळावर शेकाप पूर्ण ताकदीने आगामी निवडणुकीत उतरू शकते. त्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले. आम्ही कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. लढतो ते समोरासमोर लढतो कारण शेकाप शक्ती ही सामान्य माणूस आहे. दलित वंचीत व शेतकरी - कष्टकरी वर्गाचा आवाज शेकाप असल्याने आपली बांधीलकी त्यांच्याशी असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपा व केंद्र सरकारवर सडकून टीका करून वर्तमान भाजपा पक्ष पाट लावून आलेल्या उसन्या नेत्यांचा कोणतेही ध्येय धोरण नसलेला राजकीय पक्ष बनल्याचे सांगितले.
हेही वाचा -सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये गोंधळ घालण्याची या सरकारला सवयच जडली आहे- गोपीचंद पडळकर