महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : स्टार प्रचारकांच्या सभांवर पावसाचे सावट, उमेदवार नाउमेद - रायगड  पाऊस

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शनिवारी शेवटचा दिवस असताना या प्रचारावर पाणी पडले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली.

स्टार प्रचारकांच्या सभांवर पावसाचे सावट

By

Published : Oct 18, 2019, 7:18 PM IST

रायगड - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शनिवारी शेवटचा दिवस असताना या प्रचारावर पाणी पडले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मोठया सभा रद्द करण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे यांचा कर्जत दौरा रद्द, फोनवरून साधणार संवाद

आज कर्जत येथे महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी उद्धव ठाकरे येणार होते. परंतु पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. उद्धव ठाकरे यांच्या सभा उद्या शनिवारी रायगडात माणगाव आणि श्रीवर्धन येथे होणार आहेत. परंतु पावसामुळे या सभा रद्द होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे अखेरच्या टप्प्यातील प्रचारावर पावसाचे पाणी पडणार आहे.

हेही वाचा - रायगडात काँग्रेसच्या उमेदवार अॅड. श्रद्धा ठाकूर यांचे 'एकला चलो रे'

ABOUT THE AUTHOR

...view details