महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माथेरानची राणी पुन्हा रुळावरून घसरली, पर्यटकांना सोसावा लागला नाहक त्रास - station

या अपघातामुळे पर्यटकांना आपले सामान हातात घेऊन लहान मुलांना सांभाळत प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

माथेरानची राणी पुन्हा रुळावरून घसरली

By

Published : May 2, 2019, 8:52 AM IST

रायगड- माथेरानकडून नेरळकडे पर्यटकांना घेऊन निघालेली माथेरानची राणी पुन्हा एकदा रुळावरून घसरल्यामुळे पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. ही गाडी रुळावरून घसरून अपघात झाला असला तरी प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. मात्र, रुळावरून गाडी घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बुधवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी माथेरान या स्थानकातून पर्यटकांना घेऊन निघालेल्या गाडीचे जुम्मापट्टी स्थानकाच्या दरम्यान सुमारे ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ४०७ हे इंजिन रुळावरून खाली घसरले. माथेरान राणीला रुळावर पूर्ववत आणण्यासाठी वेळ लागत असल्याने प्रवाशांना पाच किमीचा प्रवास जंगलातून चालत पार करून मुख्य रस्त्यावर यावे लागले. मुख्य रस्त्यावर येताच पर्यटकांना मिळेल त्या वाहनांना हात करत अतिरिक्त पैसे मोजून आपला पुढील प्रवास करावा लागला.

माथेरानची राणी पुन्हा रुळावरून घसरली

या अपघातामुळे पर्यटकांना आपले सामान हातात घेऊन लहान मुलांना सांभाळत प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. या प्रवासादरम्यान स्थानिकांनी पर्यटकांना भर उन्हात चालत येत पाहिल्याने या वाटसरूंना पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. माथेरान राणीचे हे रडगाणे कायम असेच सुरु असल्याने एकंदरीतच रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसते.

ABOUT THE AUTHOR

...view details