रायगड -माथेरान मिनी ट्रेन व शटलसेवा बंद असल्यामुळे माथेरानकरांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. पर्यटन हंगामासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबरला सुरु होणारी मिनी ट्रेन अनिश्चित काळासाठी रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे.
यावर माथेरानच्या नागरीकांनी तसेच सर्व पक्षीय नेते मंडळीनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'रेल रोको' आणि विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे तसेच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. माथेरानकरांची मनधरणी सुरू करण्यात आली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी माथेरान करांची भेट घेतली. ही ट्रेन लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन केले.