रायगड - कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गजबजलेल्या बाजारपेठा आता सुन्या दिसू लागलेल्या आहेत. तरीही रस्त्यावर काही प्रमाणात गर्दी दिसत आहे. बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवांना मात्र या बंदीतून वगळले आहे.
कोरोना : रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा बंद; नागरिकांची तुरळक गर्दी हेही वाचा...कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती
रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा एक बाधित रुग्ण आढळला आहे. असे असले तरी परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा व आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीची ठिकाणेही बंद केली गेली आहेत.
हेही वाचा...'कोरोनाचं संकट टळेपर्यंत ३ महिन्यांसाठी सीएए, एनपीआर रद्द करा'
रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा बंद करण्याचे आदेश 20 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यानंतर सायंकाळी खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. मात्र, भाजी, दूध, औषधे, पेट्रोल पंप या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. असे असतानाही नागरिकांनीही स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे.