महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीचा फटका..! दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू खातोय भाव, नवरात्रौत्‍सवात ग्राहक नाराज

रायगड जिल्ह्यात झेंडूचे दर गगनाला भिडले आहेत. निसर्ग वादळ आणि अतिवृष्टीचा फटका बसल्याने झेंडूच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात झेंडूची आवक घटल्याने आणि दसऱ्यानिमित्ताने मागणी वाढल्याने भाव वाढ झाली आहे.

marigold-flower-prices-
दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू खातोय भाव

By

Published : Oct 24, 2020, 1:25 PM IST


रायगड- सध्‍या नवरात्रौत्‍सव सुरू असून उद्या(रविवारी) दसरा आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेल्या या वर्षीच्या नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारले आहेत. निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे झेंडूचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्याचा परिणाम झेंडू फुलांच्या पुरवठ्यावर झाला आहे. या वर्षी बाजारात झेंडू फुलांची आवाक घटली असून फुलांचे दर 150 ते 200 रुपये किलोवर पोहोचली आहेत.

दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू खातोय भाव
नवरात्रोत्सवात पूजाअर्चा करण्यासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दरवर्षी नवरात्रौत्‍सवासाठी फुलांच्या मागणीचा विचार करून अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात. या वर्षी मात्र निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसाने झेंडूची शेती झोडपून काढल्यामुळे झेंडूच्या उत्पादनावर याचा परिणाम झाला. जवळपास पन्नास टक्के झेंडू उत्पादन कमी होत आहे. नवरात्र आणि विजयादशमीला झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्याप्रमाणात केली जाते. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीने झेंडुला चांगलाच फटका बसला आहे. ऐन नवरात्रौत्‍सवाच्‍या हंगामात झेंडूची आवक कमी झाली. त्यामुळे पिवळ्याधमक झेंडूने कमालीचे दर गाठले आहेत.
दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू खातोय भाव
भाविकांमध्ये नाराजी-प्रतिवर्षी 50 ते 60 रुपये किलोने मिळणारा झेंडू यावर्षी दीडशे ते दोनशे रुपये पार झाल्याने भाविककांमध्‍ये नाराजी आहे. मात्र पूजेसाठी आवश्यक असणारी फुले कमी प्रमाणात का होईना ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत. अतिवृष्टीमुळे जवळपास पन्नास टक्के रोपे कोलमडली आहेत. त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. परीणामी घावूक दर वाढले आहेत. त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर झाला असून यावर्षी 200 रुपये प्रति किलो झेंडू विकला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details