रायगड - मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज रायगडतर्फे हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. शासनामार्फत रविवारी घेण्यात येणारी राज्यसेवा आयोगाची परीक्षा रद्द करावी, अन्यथा परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी दिला आहे.
अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांना हार घालून मोर्चाची सुरुवात झाली. शिवाजी चौकातून मारुती मंदिर मार्गे मोर्चा हिराकोट तलावाजवळ आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित समाज बांधवासमोर आपले विचार मांडले. यावेळी घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता.