रायगड- वसुबारसच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. या दिवसाचे औचित्य साधून काल (शुक्रवार) संध्याकाळी रायगड न्यास प्रबोधिनीच्यावतीने मराठा आरमाराचे सरदार सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या अलिबाग येथील समाधीस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे यांनी सपत्नीक समाधीचे शास्त्रोक्त पूजन केले.
अलिबागमध्ये मराठा आरमार दिवस साजरा, कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीस्थळी पूजन
वसुबारसच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. या दिवसाचे औचित्य साधून काल (शुक्रवार) संध्याकाळी रायगड न्यास प्रबोधिनीच्यावतीने मराठा आरमाराचे सरदार सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या अलिबाग येथील समाधीस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे यांनी सपत्नीक समाधीचे शास्त्रोक्त पूजन केले.
रघुजीराजे यांनी तत्कालीन मराठा आरमाराचे महत्व विशद केले. यासाठी इतिहासातील अनेक दाखले दिले. ढोलताशांच्या गजरात आणि शिवाजी महाराज की जय, अशा जयघोषात हा दिवस साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच आयोजित या कार्यक्रमाला अलिबागकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचे यापुढे दररोज पूजन केले जाणार असून त्याची जबाबदारी अलिबाग परिसरातील 40 कुटुंबीयांनी घेतली असल्याची माहिती यावेळी रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. या उपक्रमात दररोज आणखी लोक जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.