रायगड - शासनाने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे कोरोनाचे नियम पाळून वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आज (27 जानेवारी)पासून जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. विद्यार्थीही आठ महिन्यानंतर शाळेत दाखल झाल्याने तेही आनंदित आहेत. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू झाल्या असल्यातरी अनेक शाळेत पालकसभा झाल्या नसल्याने आज शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसत होती.
अनेकांचे रिपोर्ट येणे बाकी
जिल्ह्यात 894 शाळेत 31 हजार 912 विद्यार्थी आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळेचे वर्ग सुरू झाले आहेत. जिल्ह्यात 894 पाचवी ते आठवीच्या शाळा आहेत. यामध्ये 31 हजार 912 विद्यार्थी आहेत. 915 शिक्षक असून त्याची कोविड तपासणी करण्यात आलेली आहे. मात्र अनेकांचे रिपोर्ट आलेले नसल्याने अद्याप काही शाळा सुरू झालेल्या नाहीत.