रायगड - पावसाळ्यामुळे चार महिने बंद असलेली मांडवा ते गेट वे जलवाहतूक बोटसेवा आज (सोमवार) २२ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. सध्या सुरू झालेली बोटसेवा अर्धवेळ असून हवामानाच्या अंदाजानुसार सुरू राहणार आहे. पाऊस अद्यापही सुरू असल्याने यावेळी मांडवा गेट वे जलवाहतूक सेवा उशिरा सुरू झाली आहे. जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
हे ही वाचा -मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून होणार सुटका; राज्य सरकार जलवाहतूक सुरू करण्याच्या तयारीत
अलिबागमार्गे मुंबईमध्ये जाण्यासाठी जलवाहतूक सगळ्यात सोयीस्कर मार्ग आहे. जून महिन्यात पावसाळा सुरू होण्याआधी मांडवा ते गेट वे ही बोटसेवा हवामानामुळे चार महिने बंद केली जाते. त्यामुळे अलिबाग आणि मुंबईतील प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा लागतो. पर्यटकांनाही हा जलवाहतूकीचा प्रवास आनंददायी व सुखकारक वाटतो.