महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनसेवा पतसंस्थेत करोडोंचा घोटाळा; व्यवस्थापक नरेंद्र भुसाणेंना ठेवीदारांचा चोप - जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेत करोडोंचा गैरव्यवहार

श्रीवर्धन शहरात जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेत करोडोंचा गैरव्यवहार झाला असून अनेक ग्राहकांची ठेवी पतसंस्थेत अडकल्या आहेत. नरेंद्र भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष असून जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. नरेंद्र भुसाणे यांना जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बेदम मारहाण केली.

नरेंद्र भुसाणे

By

Published : Sep 19, 2019, 11:03 PM IST

रायगड - श्रीवर्धनचे विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बेदम मारहाण केली आहे. नरेंद्र भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष असून जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत.

जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र भुसाणे यांना ठेवीदारांचा चोप


जनसेवा पतसंस्थेत भुसाणे यांनी 4 कोटींची अफरातफर केल्याची शंका ठेवीदारांना आहे. पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार झाला असून ठेवीदारांचे पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संतप्त ठेवीदारांनी आपला राग भुसाणे यांच्यावर काढला. यावेळी पोलिसांनी भुसाणे याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. ठेवीदारांचा मार खाल्यानंतर भुसाणे हे गुपचुप निघून गेले.

हेही वाचा - केवळ ४.७ किलोग्रॅम वजनाच्या बाळाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी


श्रीवर्धन शहरात जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था 1994 साली स्थापन करण्यात आली होती. या पतसंस्थेने थोड्याच दिवसात ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी ठेवी ठेवल्या आहेत. पतसंस्थेत करोडोंचा गैरव्यवहार झाला असून अनेक ग्राहकांची ठेवी पतसंस्थेत अडकल्या आहेत. 19 सप्टेंबर रोजी सर्वांच्या ठेवी परत मिळतील असे बोलले जात होते. मात्र, ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने ठेवीदारांनी नरेंद्र भुसाणे यांना चपलांनी मारहाण केली. पोलिसांनी भुसाणे यांना ताब्यात घेतले आहे.


दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा श्रीवर्धन येथे येणार आहे. जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार ही यात्रा रोखणार असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details