महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तांबडी अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपी बारा तासात जेरबंद - raigad police action

तांबडी गावातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून जीवे मारणाऱ्या नराधमाच्या रायगड पोलिसांनी बारा तासात मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

raigad police
तांबडी अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपी बारा तासात जेरबंद

By

Published : Jul 28, 2020, 12:16 PM IST

रायगड - रोहा तालुक्यातील तांबडी गावातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून जीवे मारणाऱ्या नराधमाच्या रायगड पोलिसांनी बारा तासात मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली. 26 जुलैला अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती.

तक्रारदाराचे वडील ताम्हणशेत येथे शेतात काम करण्यासाठी गेले होते. तक्रारदाराची अल्पवयीन मुलगी ही स्कुटीवरून सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आपल्या आजोबांना शेतावरून आणण्यास गेली होती. मात्र, आठ वाजले तरी मुलगी आली नसल्याने शोधाशोध केल्यानंतर ताम्हणशेत बुद्रुक याठिकाणी मुलीची स्कुटी पडलेली दिसली. मात्र, मुलीचा आजूबाजूला शोध लागला नाही. गावातील ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी ताम्हणशेत बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला. वावळ्याचा कोंड येथे मध्यभागी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान विवस्त्र अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळला. याची खबर रोहा पोलिसांना दिल्यानंतर अज्ञात आरोपीला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

रायगड पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी आठ पथक तयार करून शोध सुरू केला. हत्या झालेल्या वेळेत त्याठिकाणी कोण गेले याचा तपास पथकाने घेतला. कामशेत गावातील आरोपी असल्याचे पोलिसांना कळले त्यानंतर या आरोपीला अटक करून पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने हे कृत्य एकट्याने केल्याचे कबूल केले. पोलिसांनी बारा तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मृत अल्पवयीन मुलगी ही आपल्या आजोबांना शेतावर आणण्यासाठी स्कुटीवर जात होती. त्यावेळी नराधम आरोपी हा कोणाकडे तरी पैसे आणण्यासाठी गावात जाण्यासाठी रस्त्यावर उभा होता. मुलगी येताना पाहून आरोपीने तिला थांबविले आणि जबरदस्तीने तिचे केस पकडून वावळ्याचा कोंड येथील ओहळ्यात नेऊन तिच्या डोक्यात दगडाने वार करून त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपी पळून गेला.

ABOUT THE AUTHOR

...view details