रायगड(पेण) -तालुक्यातील रोडे-काश्मीरे येथील एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेलकरून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. प्रशांत सदाशिव पाटील असे या आरोपीचे नाव असून त्याने पीडितेसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती.
पेण येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक - पेण अल्पवयीन मुलगी अत्याचार
पेणमध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री केलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तिच्या प्रेम प्रकरणाबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी आरोपीने दिली. मुलीला मुंबई-गोवा महामार्गावरील लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला.
पीडित अल्पवयीन मुलगी 11 मार्चला कॉलेजवरून एकटीच पायी येत असताना तिचा पाठलाग केला. तिच्या प्रेम प्रकरणाबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी दिली. त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला मुंबई-गोवा महामार्गावरील लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले, अशी तक्रार पीडित अल्पवयीन मुलीने पेण पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत पेणचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.एन.पिंपळे यांनी आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.