महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिळगुळ घ्या गोडगोड बोला : तिळाचे मोदक आणि तिळगुळ पाककृती - raigad Sesame Modak

मकर संक्रातीला तिळाचे महत्त्व अधिक असते. तसूभर असलेला एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला असल्याचे अनेकदा बोलले जाते. अशा या तीळाचे मकर संक्राती सणादिवशी राज्यातील विविध भागात खाण्याचे प्रकार केले जातात. रायगड जिल्ह्यात तिळापासून तिळगुळ आणि तिळाचे मोदक मकर संक्रातीला बनविले जातात. याची पाककृती ईटीव्ही भारतमार्फत आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. हे तिळाचे मोदक, तिळगुळ आपल्या प्रिय जनांना देऊन या मकर संक्रातीला प्रेमाचा गोडवा वाढवा.

तिळगुळ घ्या गोडगोड बोला
तिळगुळ घ्या गोडगोड बोला

By

Published : Jan 5, 2021, 4:07 PM IST

Updated : Jan 5, 2021, 6:03 PM IST

रायगड - मकर संक्रातीला तिळाचे महत्त्व अधिक असते. तसूभर असलेला एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला असल्याचे अनेकदा बोलले जाते. अशा या तीळाचे मकर संक्राती सणादिवशी राज्यातील विविध भागात खाण्याचे प्रकार केले जातात. मकर संकृती दिवशी तिळगुळ, तिळाचे मोदक हे एकमेकाला देऊन मनातील प्रेम, आपुलकी वाढवली जाते. रायगड जिल्ह्यात तिळापासून तिळगुळ आणि तिळाचे मोदक मकर संक्रातीला बनविले जातात. तिळगुळ आणि तिळाचे मोदक कसे बनविले जातात यासाठी ईटीव्ही भारतमार्फत आपल्याला पाककृती घेऊन आलो आहोत.

तिळगुळ घ्या गोडगोड बोला : तिळाचे मोदक आणि तिळगुळ पाककृती

हेही वाचा -आजच्या नाश्त्यासाठी खास रेसिपी; 'पौष्टिक पेसरट्टू'


साहित्य : तिळगुळ आणि तिळाचे मोदक बनविण्यासाठी तीळ (पॉलिश किंवा साधे) पाव वाटी, शेंगदाणे भाजून पेस्ट केलेले (पाव वाटी), गुळ चिकीचा अथवा साधा ( पाव किलो), चमचाभर तूप, खोबऱ्याचा भाजलेला किस


कृती : तिळाचे मोदक, तिळगुळ करण्यासाठी आधी शेंगदाणे हे गॅसवर मध्यम आचेवर तव्यात वा उभट पसरट भांड्यात चांगले भाजुन घ्या. भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर ते मिक्सरला वाटून त्याचा कूट तयार करा. तीळही चांगले तव्यावर भाजून घ्या. (जास्त भाजू नका अन्यथा त्याला कडवट पणा येऊ शकतो.) त्यानंतर गुळ बारीक करून तो मध्यम आचेवर कढईत अथवा उभट पसरट भांड्यात टाकून हलवून घ्या. गुळ पातळ होत असताना त्यात एक चमचा तूप टाका. गुळाचा रस योग्य प्रमाणात झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या. त्याची पातळ गोळी होत असेल तर गुळाचे मिश्रण योग्य झाले असे समजा. ( यासाठी एका डिशमध्ये मिश्रणाचे दोन तीन थेंब टाकून बघा)


गुळाचे मिश्रण तयार झाल्यानंतर भाजलेले तीळ, शेंगदाणा कूट, खोबऱ्याचा किस टाकून मिश्रण ढवळा. (मिश्रण ढवळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा अन्यथा मिश्रण करपेल) त्यानंतर मिश्रणाचा पाक झाल्यानंतर मध्यम गरम गरम असताना तुप मोदक भांड्याला लावून मोदक तीळ वळण्यास सुरुवात करा. तर हातावर मिश्रण घेऊन तिळगुळ करा.

तिळाचे तयार झालेले हे तिळाचे मोदक, तिळगुळ आपल्या प्रिय जनांना देऊन आपल्यातील प्रेमाचा गोडवा या मकर संक्रातीला वाढवा.

हेही वाचा -घरीच बनवा स्वादिष्ट खमण ढोकला...

Last Updated : Jan 5, 2021, 6:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details