रायगड - तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी, असे वक्तव्य भर सभेत उरण भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी केले आहे. त्याचे हे वक्तव्य उरण मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय झाला आहे. महेश बालदी यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणतात.. तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी! - भाजपाने बंडखोर महेश बल्दीची बातमी दिली
तुन्ही मला मत देणार आहात की मुलगी असे वक्तव्य भरसभेत भाजपचे भंडखोर उमेदवा महेश बालदीनी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली. भाजपचे महेश बालदी हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, मनोहर भोईर यांना उमेदवारी दिल्याने महेश बालदी यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु भाजपकडून त्यांच्यावर अद्यापही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीचे मनोहर भोईर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महेश बालदी यांची 11 ऑक्टोबरला उरण मतदारसंघात कॉर्नर सभा घेतली होती. त्यावेळी आपल्या भाषणात त्यांची जीभ घसरली. विरोधक हे भाषणात माझ्या जातीचा उल्लेख करत आहेत. मी येथेच जन्मलो असून जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. असे असताना तुम्ही मला मत देणार आहात का मुलगी असे वक्तव्य महेश बालदी यांनी आपल्या भाषणात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उरणमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.