रायगड- शिवसेना-भाजप युती झाल्याची घोषणा पत्रकाद्वारे करण्यात आलेली आहे. त्यामध्ये उरण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. विद्यमान आमदार मनोहर भोईर यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर युती झालेली असताना भाजपचे नेते, जेएनपीटीचे विश्वस्त व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्ती महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे युतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा -रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; आमदार सुरेश लाड यांचा निवडणूक लढवण्यास नकार
उरण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार विवेक पाटील यांचा पराभव करून मनोहर भोईर विजयी झाले होते. विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनाच पुन्हा शिवसेनेने तिकीट दिले आहे. उरण विधानसभा मतदातसंघ भाजपला सोडण्याची मागणी करण्यात आली होती.