रायगड- आजच्या महाराष्ट्र दिनावर कोरोनाच्या आजाराची छाया दिसून आली. जिल्ह्यात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
रायगडात महाराष्ट्र दिनावर कोरोनाची छाया, साधेपणाने दिवस साजरा - maharashtra day raigad
पोलीस बॅन्डच्या साथीने राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या.
पोलीस बॅन्डच्या साथीने राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी बोडके, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह मोजकेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही ध्वजारोहण किंवा अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते.
हेही वाचा-रायगड : श्रमदानातून खर्डी गावातील विहीर आणि बंधारा केला स्वच्छ