केनियाची राजधानी नैरोबी येथे महाराष्ट्र मंडळ यांच्यावतीने 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतातून केनियात जमलेले मराठी बांधव गुण्यागोविंदाने एकत्रित येत आपली संस्कृती जपत असल्याचे पाहायला मिळत आहे.
खोपोलीतील संदीप पाटणकर यांच्या मुलींनी उत्कृष्टपणे केले किल्ले सादरीकरण
खोपोलीतील संदीप दत्तात्रेय पाटणकर हे गेली 15 वर्ष केनियात नोकरी व व्यवसाय निमित्त कार्यरत आहेत. 8 वर्ष सीमेन्स या जगप्रसिद्ध कंपनीत ते ब्रँच हेड होते, तर गेले 7 वर्षांपासून ते स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. संदीप व मुग्धा पाटणकर यांच्या कन्या ऋचा व रमा यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी किल्ल्याविषयी उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली आहेत. आपला इतिहास हा युवा पिढीच्या मनावर कोरण्याचे कार्य करणाऱ्या या महाराष्ट्रीयन मंडळीचे खरंच कौतुक आहे.