रायगड- पोलादपूरनजिक पायटे येथे आंबेनळी घाटात अक्कलकोट ते महाड एसटी बस दरीत ३० फूट कोसळली. यामध्ये चालकासह १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर महाड आणि पोलादपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दूर्घटना टळली आहे.
अक्कलकोट वरून महाडकडे एसटी बस (एमएच 14/ बीएल 3236) येत होती. त्यावेळी आंबेनळी घाटात पायटे येथील गावाजवळ वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस 30 फूट खोल दरीत पडली. बस पलटी होताना आंब्याच्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - सिद्धगडावर दीपोत्सव करून हुतात्म्यांना आदरांजली
यामध्ये स्नेहा गायकवाड, जनाबाई पंडित, सुषमा गायकवाड, बाबाजी बरगे, गीता मीठ्ठा, नवीन खरात, शिल्पा रिंगे, संतोष साने, बहादूर दुबे, सादिका गैबी, अवधूत दुबे, कलम वाघे, मनोज वाघे, तेजस आढाव, सूरज जाधव, प्रसाद नीरजा, महंमद काजी, राहूल पवार, पृथ्वीराज आयरे हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पोलादपूर व महाड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या 4 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा