रायगड - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. गुरुवारी (1 जुलै) सायकाळंच्या सुमारास मुंबई-पणे एक्सप्रेस वे वर आडोशी उतारावर झालेल्या या अपघातात एका कारचा चक्काचूर होऊन कार जळून खाक झाली. या कारमधील तिघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात आई-वडील व तरुण मुलाचा समावेश होता.जोक्विन चेटियार ( वय 36), लुईझा चेटियार (वय 35) व डॅरिल चेटियार (वय 4) अशी मृतांची नावे असून हे सर्व नायगाव (मुंबई) येथील रहिवासी आहेत..
हेही वाचा-'पप्पा, मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून 20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
अपघाताचा थरार टँकरच्या रिअर कॅमेऱ्यात कैद -
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस वे वरील आडोशी तीव्र उतारावर कंटेनरने आयटेन कारला जोरदार धडक दिल्याने ती कार पुढच्या ट्रकवर धडकली व कारने पेट घेतला. दरम्यान त्याच कंटेनरने पुढील अजून एका कारला धडक देऊन अनियंत्रित होऊन रस्त्याखाली जाऊन उलटला. यात आयटेन कार जळून पूर्णपणे खाक झाली व यातील तीन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालकही गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा-CCTV Video कल्याण रेल्वे स्थानकात तरुणाची चाकूने वार करून हत्या
आई-वडील व मुलाचा मृत्यू -
या भीषण अपघाताची माहिती मिळताचा खोपोली पोलीस, एक्सप्रेस वरील बोरघाट व पळस्पे क्षेत्र वाहतूक पोलीस, आपत्कालीन यंत्रणा, डेल्टा फोर्स यांनी तातडीने मदत कार्य करून मृत व्यक्तींना वाहनातून बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करण्याची कामगिरी बजावली. तसेच महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सुमारे दीड तासानंतर मार्गावरील वाहतूक सुरुळीत झाली.