महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर रायगडमध्ये मद्यविक्री सुरू, पहाटेपासूनच दुकानांसमोर रांगा - रायगड मद्यविक्री

रेड झोनसह ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील मद्याची दुकाने सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर तळीरामाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. 4 मे रोजी दुकाने उघडणार म्हणून तळीराम दुकानासमोर रांगा लावून उभे होते. मात्र, दुकाने उघडली नसल्याने मद्यपी हिरमसून घरी गेले होते.

raigad liquor selling  raigad latest news  रायगड मद्यविक्री  रायगड लेटेस्ट न्युज
अखेर रायगडमध्ये मद्यविक्री सुरू, पहाटेपासूनच दुकानासमोर रांगा

By

Published : May 5, 2020, 12:49 PM IST

रायगड - आज 5 मे रोजी दारूची दुकाने उघडी होणार असल्याचे कळल्यावर तळीराम पहाटेपासूनच दुकानासमोर रांगा लावून उभे होते. दुकाने सुरू होताच आता दारू मिळणार, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. दरम्यान, दुकाने सुरू झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळत मद्यविक्री केली जात आहे.

अखेर रायगडमध्ये मद्यविक्री सुरू, पहाटेपासूनच दुकानासमोर रांगा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दीड महिना उलटून गेला. या काळात मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे मद्यपींच्या जीवाची घालमेल झाली होती. अनधिकृतपणे जिल्ह्यात मद्य विक्री सुरू असली तरी अव्वाच्या सव्वा पैसे देऊन तळीराम मद्य विकत घेत होते. त्यामुळे मद्याची दुकाने कधी सुरू होणार? याकडे तळीरामांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर शासन आणि प्रशासनाने कोरोनाबाधीत क्षेत्र वगळून मद्याची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तळीरामांना खुश केले.

जिल्ह्यात आज 5 मेपासून मद्यविक्री सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने पहाटेपासून दुकानासमोर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत होत्या. प्रत्येक व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्य विक्री सुरू केली. यावेळी मद्य खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सॅनिटायझर लावूनच सोडत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details