रायगड - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी महाड-पोलादपूरचे आमदार प्रविण दरेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर, महाडमध्ये आल्यानंतर भाजपाच्यावतिने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाड-पोलादपूरचे भूमीपुत्र आमदार प्रविण दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करून कोकणासह महाड-पोलादपूरला सुखद धक्का दिला आहे. हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे विरोधी पक्षाची प्रभावी बाजू मांडून शेतकरी अर्थ सहाय्य, शेतकरी कर्ज माफी आणि स्थगित केलेल्या विकास कामांविषयी दरेकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
हेही वाचा - पनवेलमधल्या कामोठ परिसरातील इमारतीला आग; जीवितहानी नाही
अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षनेते दरेकर हे प्रथमच महाड-पोलादपूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाड येथे गांधारीनाका येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन करून छ. शिवाजी महाराज चौक येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हासरचिटणीस बिपीन महामुणकर, उपजिल्हाध्यक्ष राजेश भोसले, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान विसावा हॉटेल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी बोलताना शिवसेने मराठी माणसाचा विश्वासघात केला आहे. त्यांनी सत्तेसाठी हिदुत्व सोडले, राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यावर शिवसेनेनी बोटचेपी भूमिका घेतली, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - रायगडमधील शेतकऱ्याने आंतरपीक घेऊन फुलविला भाज्यांचा मळा